यशवंत रास्ते सर : पुस्तकांवरील ‘अव्यभिचारी निष्ठे’ने त्यांनी जो उत्तमतेचा ध्यास घेतला, त्यामुळे ते ग्रंथपाल म्हणून एक वेगळी ओळख निर्माण करू शकले

रास्ते सरांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वतःचे शिक्षण पूर्ण केले. तेव्हा त्यांना आलेल्या अनुभवांचे स्मरण ठेवून महाविद्यालयातील सहकारी प्राध्यापकांकडून स्वेच्छापूर्वक निधी जमा करून, त्यांनी अनेक कमकुवत आर्थिक गटातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी सहाय्य केले. दर महिन्याला त्या विद्यार्थ्यांच्या खात्यात विशिष्ट रक्कम जमा होईल आणि त्याच्या महत्त्वाच्या गरजा पूर्ण होतील, याची ते काळजी घ्यायचे.......

समाजाच्या भविष्याचा विचार जर विवेकाच्या मार्गाने घडायचा असेल, तर ‘गांधीनगर’ हे त्या मार्गावरचे आश्वस्त करणारे एक स्थानक निश्चित असेल

एक अटळ वास्तव म्हणून भारताच्या फाळणीचा विचार करताना, या काळात धार्मिक मिषाने घडलेल्या अतोनात हिंसाचाराचा, दोन्ही बाजूंकडून दुबळ्या जीवांवर केलेल्या अन्याय-अत्याचाराचा, उदध्वस्त कुटुंबांचा, परागंदा स्त्रियांचा विचार जसा प्राधान्याने करायला हवा, तसाच या फाळणीत होरपळलेल्या एका जनसमूहाने दुबळेपणाला दूर करत सक्षमपणे उभ्या केलेल्या गांधीनगरसारख्या व्यापारी वसाहतीच्या यशोगाथेचेही चिंतन करायला हवे.......